सोलापुरात बाळराजेंचे भाऊ आणि भाईंकडून जोरदार स्वागत ; अनगरकरांचा सोलापुरात वाढता संपर्क
सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोलापूर शहराने जिल्ह्यामध्ये गटबाजीला उधाण आले आहे. पूर्वी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे सहकारी मानले जाणारे शहराचे अध्यक्ष संतोष पवार आणि शहराचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान हे आता मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या जवळ जाताना दिसत आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील हे आता शहरांमध्ये आपला संपर्क वाढवताना पाहायला मिळत आहे. त्यांनी यापूर्वी महिला कार्याध्यक्ष उज्वला पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली होती आता ते सोलापूर शहरात अध्यक्ष संतोष पवार यांच्या डॉक्टर आंबेडकर चौकातील कार्यालयात दिसून आले.
अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी बाळराजे पाटील यांचा आपल्या कार्यालयात जंगी सत्कार आणि स्वागत केले. बाळराजें सोबत मोहोळ बाजार समिती सभापती धनाजी गावडे, राष्ट्रवादी युवक मोहोळ तालुका अध्यक्ष राहुल मोरे, शशीकांत पाटील, अमर चव्हाण हे नेतेमंडळी उपस्थित होती.
बाळराजे पाटील यांच्या सत्कारावेळी अध्यक्ष संतोष पवार यांनी आपली समर्थक टीम उभी केली होती. त्यामध्ये सोलापूर शहर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख, वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष संजय मोरे, मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादिराजे, कार्याध्यक्ष विकास हिरेमठ, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे, कार्याध्यक्ष शत्रुघ्न कांबळे, सेक्रेटरी दत्ता बनसोडे, दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर, सोशल मिडीया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, उत्तर विधानसभा अध्यक्ष अमोल कोटीवाले, कार्याध्यक्ष मनोज शेरला, निशांत तारानाईक हे उपस्थित होते.