सोलापुरात शासकीय कर्मचाऱ्यांनी दिले सरकारला पुन्हा टेन्शन ; आंदोलनाने वेधले लक्ष
सोलापूर : जुनी पेन्शन , वेतन त्रुटी , व प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या प्रमुख मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्याने शुक्रवारी पुनम गेट येथे आक्रोश आंदोलन केले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यासह अनेक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.
राज्यातील शासकीय कर्मचारी यांनी 2005 नंतर सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे व इतर 18 प्रमुख प्रलंबित मागण्यासाठी मुदत संप केला होता. मात्र शासनाने राज्यातील कर्मचारी संघटनेच्या नेत्यांशी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत व शासनाच्या प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करून कर्मचारी वर्गाच्या प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन लागू करणे याविषयी लिखित स्वरूपाचे संघटनेच्या नेत्यांना आश्वासित केले. उर्वरित मागण्यावर विभागावर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील असेही सांगितले.
त्यामुळे संप मागे घेण्यात आला होता. त्यानंतर शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे आवश्यक होते मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले असल्याची माहिती कर्मचारी संघटनेने दिली.
यावेळी शंतनू गायकवाड, अविनाश गोडसे, विवेक लिंगराज, राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे, सचिन मायनाळ, तजमुल मुतवली, एस पी माने, विशाल घोगरे, बसवराज दिंडोरे, राजेंद्र वारगड आदीसह कर्मचारी संघटनेचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.