मोहोळ मधून रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम तुतारी घेणार हाती ; उमेदवारी जाहीर
सोलापूर अनेकांचे लक्ष लागलेल्या मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली.
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात कोण याकडे सर्वांचे लक्ष होते.
या विधानसभा मतदारसंघात संजय शिरसागर, माजी आमदार रमेश कदम, शिवसेनेचे राजू खरे असे अनेकांची नावे होती यामध्ये राजू खरे यांचे नाव फायनल झाले असेही चर्चा ऐकण्यास मिळाली परंतु रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता उमेश पाटील यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे नजरा लागले आहेत.
रमेश कदम यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष अर्ज भरून ही त्यांना 25000 पेक्षा जास्त मते मिळाली होती तसेच त्यांच्या कन्या सिद्धी कदम यांनीही वडिलांसाठी या मतदारसंघात सर्व गावही फिरून प्रचार केला होता. त्यामुळे तो चेहरा सर्वांच्या लक्षात राहणारा आहे.