माळशिरस मध्ये देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार ; राम सातपुते यांचे आयोजन
माळशिरसचे माजी आमदार भारतीय जनता पार्टीचे नेते राम सातपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या पाच मार्च रोजी देवा भाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवास मिळणार आहे.
श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान, पुरंदावडे – सदाशिवनगर या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
राम सातपुते यांनी शुक्रवारी मुंबईमध्ये येत्या 5 मार्च रोजी होणाऱ्या देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचे स्मृतिचिन्ह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केले.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही या ऐतिहासिक शर्यतीसाठी शुभेच्छा दिल्या असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या परंपरेच्या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन केले आहे.