जुळे सोलापुरात भव्य दांडिया महोत्सव ; या दोन सिने अभिनेत्रींचे प्रमुख आकर्षण
सोलापूर : संपूर्ण देशात शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने जुळे सोलापुरात महिलांसाठी भव्य दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
बनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळ, सोनाई फाउंडेशन, रुक्मिणी प्रतिष्ठान व समर्थ इलेक्ट्रॉनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी 7 ऑक्टोबर सायंकाळी सहा ते दहा या दरम्यान टाकळीकर मंगल कार्यालय या ठिकाणी या उत्सवाचे आयोजन होत आहे.
या दांडीया उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रेमास रंग यावे यामधील अभिनेत्री प्रमिला कुलकर्णी व अग बाई सुनबाई यामधील अभिनेत्री गीतांजली गणगे यांच्या आहे.
या उत्सवात लाखो रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली असून सहभागी स्पर्धकांना गिफ्ट देण्यात येणार आहे. महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सोनाई फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड आणि रुक्मिणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.