“ये तो साला एक दिन होना ही था ” ; पोलिसांनी वेळीच ऍक्शन घेतली असती तर…. ; चर्चा रंगली
सोलापूर : रस्त्याच्या मध्ये थांबलेले पाहून बाजूला थांबा का म्हणाला याचा राग धरून एका युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सहा जणांविरोधात जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना रविवार पेठेतील प्रकाश टेलर दुकानासमोर तीन ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली. दरम्यान हे भांडण तिथे बाजूला चालत असलेल्या बेकायदेशीर क्लब मुळे झाल्याची चर्चा असून पोलिसांनी अशा बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर वेळीच कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती, याच क्लबमुळे यापूर्वीही अशा गंभीर घटना घडल्या असल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत.
जखमी श्रीनिवास दत्तात्रय मंजेली, वय-३४ याने दिलेल्या फिर्यादीवरून
नागेश मंठाळकर, अनिल विटकर, श्रीनिवास मुदगल, राजू जाधव, धीरज बंदपट्टे, राहुल मुदगल सर्व राहणार रविवार पेठ सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
यात हकिकत अशी की, यातील फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ सिध्दार्थ मंजेली असे मिळून फिर्यादी हा घरी जात असताना प्रकाश टेलर दुकानासमोर वरील आरोपीत हे रस्त्यामध्ये थांबलेले होते. त्यांना रस्त्याचे बाजूला थांबा असे म्हणाल्याचा राग मनात धरून काही वेळोन वरील आरोपीत यांनी मिळून फिर्यादी हा दुकानासमोर उभारला होता तेव्हा फिर्यादीस तुला लय मस्ती आली तुला आता जिवंत सोडत नाही तुला खल्लास करतो असे म्हणून आरोपी क्र २ यांने त्यांचे हातात असणारे कोयत्याने फिर्यादीचे मानेवर पाठीवर जीवे ठार मारण्याचे उद्देदशाने वार केला.
त्यानंतर तुला आता जिंवत सोडत नाही तुझा आता मर्डरच करतो असे म्हणनू आरोपी क्र १ यांनी फिर्यादीचे डोक्यात पायाला वार केला आणि आरोप क्र ३,४,५,६ यांनी तुला जिवंत सोडत नाही तुझा गेम वाजवतो तुला लय मस्ती आली तु गल्लीचा दादा झाला का अशी म्हणून शिवीगाळ करीत हाताने लाथाबुक्यांने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भांबिष्टे करीत आहेत.