चेअरमन दिलीप माने यांच्या हस्ते ब्रह्मदेवदादा माने बँकेत श्री’ची प्रतिष्ठापना ; हा व्यक्त केला मानस
राज्यात लौकीक असलेल्या ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेत श्री.गणरायाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. बँकेचे मार्गदर्शक, सिद्धेश्वर बाजार समितीचे चेअरमन तथा माजी आमदार दिलीप माने त्यांच्या पत्नी जयश्री माने यांच्या हस्ते आरती करून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती बप्पा मोरयाच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला.
दरम्यान गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना दिलीप माने यांनी राज्यांमध्ये भरपूर पाऊस पडत असल्याने शेतकरी राजा समाधानी आहे अशीच कृपादृष्टी शेतकऱ्यांवर ठेवावी असे साकडे घालताना बँकेचे 23 शाखा आहेत त्या लवकरच 50 शाखा होतील असा मानस व्यक्त केला.
चेअरमन सोमनाथ गायकवाड, संचालक गंगाधर बिराजदार, काशीनाथ गौडगुंडे, रमेशसिंग बायस, सौ.प्रिया पाटील, गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष संतोष घोडके, अनिल शिंदे, निलेश बाबर, शाखाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते