पारधी समाज उन्नतीचा धाराशिव पॅटर्न सोलापुरात राबवा ; राजश्री चव्हाण यांची राज्यस्तरावर मागणी
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना समक्ष भेटून निवेदन दिले.
आदिवासी पारधी समाज हा बराच तालुक्यात व ग्रामीण भागात विखुरलेला असून त्यांची दैनंदिन दुरवस्था झाल्याने त्यांना रोजी रोजगाराच्या शोधार्थ गावोगावी भटकावे लागत आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी नीती आयोग अंतर्गत आदिवासी पारधी समाज यांना विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत धाराशिव जिल्ह्यात वापरण्यात आलेला पॅटर्न प्रमाणे सोलापूर जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात राबवण्यात यावा यासाठी आपले स्तरावर पाठपुरावा करून पारधी समाजातील शिकलेल्या सुशिक्षित बेरोजगार, तरुण, तरुणी, महिलासाठी व्यवसायासाठी मळणी यंत्र, मिनी ट्रॅक्टर, ऑटो रिक्षा, हॉटेल ढाबा व्यवसाय अशा विविध योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या विभागाच्या स्तरावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक लावून पारधी समाजाचा जटील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती त्यांनी निवेदनात केली.
त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती मोर्चा सरचिटणीस नकुल चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, सरपंच भूषण चव्हाण, बेंगलोर फिल्म सिटी सिनेमा कलाकार रामचंद्र पवार, सचिन काळे पंढरपूर हे उपस्थित होते.