“नाही तर तुला खल्लास करतो” ; जिल्हा परिषदेच्या अभियंत्याची ठेकेदाराला धमकी ; जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल
सोलापूर : जिल्हा परिषदेमध्ये कामकाज करताना अभियंते आणि ठेकेदार यांचे कायम संबंध येत असतात. परंतु जिल्हा परिषदेच्या एका कनिष्ठ अभियंताने युवा ठेकेदाराला थेट जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी त्या अभियंता विरोधात सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आदित्य सुनील बिराजदार वय 26 राहणार पूर्व मंगळवार पेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सर्जेराव गाडेकर या कनिष्ठ अभियंत्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.
बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ या गावी ते ग्रामपंचायतचा ठेकेदार असून त्या मिळणाऱ्या उत्पन्नावर माझे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दर्शनाळ गावामध्ये ग्रामपंचायतच्या ड्रेनेजचे काम मी केले आहे. त्या कामाचे पाहणी करिता कनिष्ठ अभियंता सर्जेराव गाडेकर यांची नियुक्ती आहे, मी केलेले काम पाहण्याकरिता या म्हणून मी वारंवार विनंती करत होतो परंतु ते टाळत होते,
दरम्यान चोवीस फेब्रुवारी 2024 रोजी रात्री दहा वाजता राहते घरी माझा मोबाईल नं.8149220355 या मोबाईल फोनवर 9168919100 या नंबर वरून फोन आला तो मोबाईल नं. सर्जेराव गाडेकर यांचा आहे. मी त्यांना वटसअॅप दरती विनंती मेसेज केला होता की कामाची पाहणी करण्या करीता या असा मेसेज बघीतल्यावर त्यानी त्यांच्या मोबाईलवरुन फोन करून मला शिवीगळी करण्यास सुरवात केली व तुला खल्लास करतो अशी दमदाटी केली आहे. व माझ्या वडीलांना पण शिवीगाळी केली आहे म्हणुन माझी सर्जेराव गाडेकर 9168919100 या नंबर विरुद्ध कायदेशिर तक्रार आहे.