Monday, March 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ईच्छा भगवंताची परिवाराच्या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद ; ७०० पुरुष तर २०० महिला खेळाडूंचा सहभाग

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 July 2025
in Sports
0
ईच्छा भगवंताची परिवाराच्या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद ; ७०० पुरुष तर २०० महिला खेळाडूंचा सहभाग
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ईच्छा भगवंताची परिवाराच्या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद ; ७०० पुरुष तर २०० महिला खेळाडूंचा सहभाग

सोलापूर -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची सामाजिक बहुउद्देशीय संस्था व नगरसेवक तथा प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अजित दादा चषक निवड चाचणी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे (मॅटवरील) आयोजन रामवाडी परिसरातील शासकीय गोदाम जवळील जांबवीर तरुण मंडळ क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आले आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/07/VID-20250724-WA0008.mp4

या स्पर्धेचे शानदार उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे, अल्पसंख्याक आयोग सदस्य वसीम बुरहान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव इरफान शेख, मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम, सिद्राम कामाटे, राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, नवयोग तरुण मंडळाचे अध्यक्ष अर्जुन साळवे, लक्ष्मण सरवदे, राजू आसादे, महादेव हुच्चे, मारुती दिवटे, कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष मदन गायकवाड, संतोष जाधव, कबड्डी निरीक्षक गिरीश जाधव मेंबर, पुंजाळ मॅडम आदींच्या उपस्थितीत क्रीडांगणाचे विधिवत पूजन करून नारळ फोडून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खेळाडूंनी उपस्थित मान्यवरांना आपला परिचय करून दिला नाणेफेक करून सामन्यास सुरुवात करण्यात आले. या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये ५० संघांनी सहभागी नोंदवला. यामध्ये ७०० पुरुष तर २०० महिला खेळाडूंचा समावेश आहे सर्व सामने हे मॅटवर खेळवले जाणार आहेत उत्कृष्ट असे नियोजन इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने या स्पर्धेसाठी करण्यात आले आहे.

दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विशेष निधीतून गवळी समाज सांस्कृतिक भवन (५० लाख) आणि मोची समाजाचे आराध्य दैवत आणि कुलदैवत असणाऱ्या महर्षी आदी जांबमुनी महाराज सांस्कृतिक भवनाचे (५०लाख ) भूमिपूजन सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी सितारामजी कामाटे, मोची समाज जनरल सेक्युरिटी नागनाथ कासलोलकर, मोची समाज उपाध्यक्ष लष्कर विभागीय अध्यक्ष अर्जुन सावळे नवयुग जांबवीर अध्यक्ष राजू असादे, दत्ता शिंगाडे सेक्युरिटी ओसेना पावलापल्ली, श्रावण कुमार गायकवाड,गोपाल कुमार, चंद्रशेखर माशाळकर ,नारायण नरसिंग बादल, यमापा बादल, तिरुपती जिंगेकर, सय्यद शासन, मार्तंड तूडोळकर, संजय केरकर, शेत्र माडेकर, हुलगप्पा शासम, यल्लाप्पा तुपडोळकर, सुरज कुंभूळ, सुंदर तुधळकर, संजय केरकर, सिद्रा माडेकर, प्रकाश शांत कुमार, नागेश धनराज सदोळकर, गवळी समाजाचे वैजनाथ गवळी, देवा अंजीखाने,शुभम राजेश सुदर्शन,अनिल नायकु, दत्ता लकडे संजय शहापूरकर, मोहन घुले, मारुती दिवटे, गणेश गाड्याप्पा, मनोज हुच्चे, चेतन यमगवळी, दत्ता बहिरवाडे, अमर नायकु, आप्पा कलागते, शुभम दिवटे, ओमकार हुच्चे, अभिषेक घुले, योगेश हुच्चे आदींसह गवळी समाजातील समाज आणि मोची समाजातील बांधवांची उपस्थिती होती.

दरम्यान कबड्डी खेळाला गतवैभव प्राप्त व्हावे या उद्देशाने राज्याची उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरीय खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे किसन जाधव यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विशेष निधीतून या भवनाचे भूमिपूजन करण्यात आले आहे लवकरच याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याचेही यावेळी किसन जाधव म्हणाले. अजित दादा चषक निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा हे पाच दिवस चालणार असून या स्पर्धेस खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यापुढील सर्व सामने व अंतिम सामना शंकर भवन उदय विकास प्रशाला शेजारी भूषण नगर लिमयेवाडी येथे होणार आहेत. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ईच्छा भगवंताची मित्रपरिवारची पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Tags: Ajit PawarKisan jadhav
SendShareTweetSend
Previous Post

क्या बात है ! सिईओ कुलदीप जंगम सोलापूरचे 15 दिवस कलेक्टर

Next Post

अनिता माळगे यांच्यावर राज्याची जबाबदारी ; एकनाथ शिंदे यांचा विश्वास

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अनिता माळगे यांच्यावर राज्याची जबाबदारी ; एकनाथ शिंदे यांचा विश्वास

अनिता माळगे यांच्यावर राज्याची जबाबदारी ; एकनाथ शिंदे यांचा विश्वास

ताज्या बातम्या

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970919
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group