“साहब मैं बुढा हो गया हुं, अरे बुढे हो आपके दुश्मन” IAS संजीव जयस्वाल यांचा मास्तर प्रति आदरभाव
सोलापूर : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण तसेच रे नगर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, म्हाडा मुंबईचे मुख्याधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य अधिकारी राहुल साकोरे, रे नगरचे मुख्य प्रवर्तक आडम मास्तर, नलिनी कलबुर्गी, युसूफ मेजर, वित्त नियंत्रक अजयसिंह पवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रांताधिकारी सुमित शिंदे, कामिनी आडम, एम एच शेख, उद्योजक प्रल्हाद काशीद यांच्यासह म्हाडाच्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत झाला.
अतिशय उत्साही वातावरणात वृक्षारोपण संपन्न झाले. प्रत्येक अधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी झाड लावण्यात आले. जयस्वाल यांनी यावेळी आडम मास्तर यांना प्रचंड आदर दिल्याचे पाहायला मिळाले. त्याचा हात धरून ते चालत होते, प्रत्येक फोटोमध्ये मास्तर यावेत यासाठी आग्रही दिसून आले. दरम्यान संजीव जयस्वाल हे जेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया देणार होते तेव्हा ही कॅमेरा मध्ये घेण्यासाठी त्यांनी आडम मास्तर यांना बोलावले. त्यावेळी मास्तर यांनी “साहब मैं बुढा हो गया हुं,” असे शब्द वापरले. तेव्हा अरे बुढे हो आपके दुश्मन साहब म्हणत त्यांना जवळ उभे करून आपली बाईट दिली. जयस्वाल यांचे हे शब्द उपस्थित सर्वांनाच भावून गेले.