सचिन ओंबासे सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त ; शितल तेली उगले यांची बदली, पोस्टिंग नाही
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शितल तेली उगले यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शितल उगले यांना पोस्टिंग दिलेली नाही.
सचिन ओंबासे हे 2015 च्या बॅचचे आयएएस आहेत. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. यापूर्वी ते वर्धा जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी होते त्यानंतर त्यांची नियुक्ती धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी झाली.
शितल तेली उगले यांनी शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम जोरदारपणे राबवली, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याची डेरिंग त्यांनी केली. त्यामुळे त्या सोलापुरात कायम चर्चेत राहिल्या.