मी पुन्हा आलोय ! अभिजीत पाटील सोलापूरचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी
सोलापूर : सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर अभिजीत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी बुधवारी आपला पदभार घेतला.
पदभार घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य महसूल कर्मचारी संघटनेते प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड, सचिव रविराज नष्टे, जिल्हा सचिव गजानन गायकवाड, कार्याध्यक्ष रणजीत मेहेत्रे, कोषाध्यक्ष खंडू भोसले, उपाध्यक्ष अमरनाथ भिंगे, सल्लागार मंगरूळकर, शहर कार्याध्यक्ष मिलिंद पेटकर, उपाध्यक्ष समाधान राऊत, विभाग अध्यक्ष व इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यापूर्वी अभिजित पाटील यांनी माळशिरस तहसीलदार, सांगोला तहसीलदार, सुरत चेन्नई महामार्ग भूसंपादन अधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्यात कार्यभार पाहिला आहे. ते आता पुन्हा सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर आले असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणि त्यांचे स्वागत केले जात आहे.