सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दीड महिन्यानंतर सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते. मधल्या काळात सोलापूर जिल्ह्याला मंजूर झालेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला हलवले.
त्यावरून सोलापूरच्या राजकारणात बराच गदारोळ झाला. सोलापूरच्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर माध्यमांनी जोरदार प्रहार केला.
याच दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील याविषयी काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. सोमवारी पालकमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्र्यांनी सोलापूरचा रोष ओळखून स्वतः अन्न उत्कृष्टता केंद्रावर स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. हा प्रोजेक्ट बारामतीला जाणार नाही परंतु प्रशिक्षण केंद्र हे बारामतीला हैदराबादच्या संस्थेने दिले आहे असे त्यांनी कागदपत्र हातात घेऊन बराच वेळ सांगितले. याच प्रश्नावर पत्रकाराने तब्बल 11 मिनिटे पालकमंत्र्यांना घेरले. परंतु ते हैदराबाद, बारामती, पवार साहेब, शरद पवार, अजित पवार असेच सांगत होते.
शेवटपर्यंत पत्रकारांना या प्रोजेक्ट बाबत पालकमंत्री म्हणून ठोस असे काही आश्वासन मिळालेच नाही. पहा या पत्रकार परिषदेत काय घडले.