ग्रेट दिलीप स्वामी ! सीएम देवेंद्र फडणवीस यांनी का दिली कौतुकाची थाप ; महसुलमंत्री यांचे कडून ही कौतुक..!
सोलापूर – छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी राबविलेले विविध उपक्रमाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केले आहे.
दिनांक २ व ३ आॅगष्ट रोजी नागपूर येथे राज्यातील जिल्हाधिकारी यांचे काॅन्फरन्स घेणेत आली. या बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविलेले विविध उपक्रमाचे सादरीकरण करणेची संधी देणेत आली. राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांचे सह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच शेतकरी यांचे बांधावर जाऊन मार्गदर्शन केले आहे. शासकीय जमिनी सुरक्षित राहणे साठी ‘लॅन्ड बॅंक’ नावाने नाविन्यपूर्ण योजना तयार केली आहे.
या उपक्रमाचे कौतुक देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. सेवादूत उपक्रमा द्वारे त्यांनी शासकीय दाखले घरपोहोच देणेची व्यवस्था केली आहे.लोकांना घरपोहोच सेवा देणे साठी सेवादूत अॅप तयार केले आहे. एका क्लिकवर घरपोहोच दाखले देणेची व्यवस्था करणेत आलेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी आदर्श आचारसंहिता तयार करून दशसुत्री करून देणेत आली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर संस्कार देखील चांगले प्रकारे होत आहेत.