

“मानलं रं पठ्ठ्या तुला” घरकुल मध्ये जनतेसाठी तो राबतोय रात्र अन् दिवस
सोलापूर : गरिबीची जान अन् परिस्थितीचे भान ठेवून जनतेसाठी रात्र अन् दिवस राबणारा एक कार्यकर्ता जुन्या विधी घरकुल मध्ये राहतो. तो रुग्णसेवक आहे, जनसेवक आहे पण त्यांनी आपल्या या कार्याची कधीच मार्केटिंग किंवा स्टंटबाजी केली नाही. त्या युवकाचे नाव आहे रुपेशकुमार भोसले.
हाच तो रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले. त्याच्या घरात कमरे एवढे पाणी, तांदुळ, ज्वारी, गहू पाण्यात , तरी ही तो लोकांच्या घराची काळजी घेत होता. लोकांना जेवन देत होता. लोकांसाठी स्वताच्या घराची परवा नव्हती.
जुना विडी घरकुल भागात मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्नसेवक रुपेशकुमार भोसले याने पहाटे चार वाजता आयुक्त ओंबासे, उपआयुक्त कारंजे, आ. विजयकुमार देशमुख यांना फोन करुन माहीती परिस्थिती माहीती दिली.
या वेळी पाण्याचा प्रवाह वेग होता त्या वेगामधे पहाटे कामाला जाणारे सुर्दशन यंगटी हे पाण्यात वाहत जात होते हे रुपेशकुमार यांच्या लक्ष्यात आले तेव्हा कसलाही विलंब न करता स्वता पाण्यात जावून त्यांची काॅलर पकडून त्यांना सुरक्षा स्थळी घेवून आले.
आ. विजयकुमार देशमुख यांच्या वतीने रुपेशकुमार यांच्या माध्यमातून जुना विडी घरकुल परिसरात जी ग्रुप, एफ ग्रुप, तुळशांती नगर या परिसरात तब्बल दीड हजार लोकांची जेवनाची व्यवस्था केली. भोसले यांच्या निवासस्थानी अन्न तयार करुन लोकांना देण्यात आले.
नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून रुपेश भोसले यांनी आ. विजयकुमार देशमुख यांच्याकडे पाणी टँकरची मागणी केली. तेव्हा उपआयुक्त कारंजे, झोन अधिकारी अविनाश वाघमारे, व मधुसुदन पवार यांनी तातडीने पिण्याची पाण्याची व्यवस्था केली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि आपल्या मातोळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्याने गोरगरीब, गरजूंची मदत केली आहे. विशेष करून वृद्धांच्या मदतीला तो कायम धावून जातो. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करतो, त्यांची देखभाल करतो, काळजी घेतो. प्रत्येक महिन्याला गोरगरिबांसाठी आरोग्य शिबिर राबवतो. कोरोना काळात त्याचे काम वाखण्याजोगे होते. असा प्रामाणिक कार्यकर्ता महापालिकेत गेला पाहिजे अशी मागणी जनतेतून होत आहे.