गाझी चा फुसका बार, मोहसीन बंडाला तयार, आता अझहर काय करणार? फारुख भाई का अब प्लॅन क्या?
सोलापूर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. सध्या नेत्याचे कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. महाविकास आघाडीमध्ये तर बिघाडी झाल्याचे चित्र आहे. सारखीच परिस्थिती सोलापूर मध्ये एम आय एम या पक्षामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे.
शहर अध्यक्ष फारुक शाब्दि हे शहर मध्य मध्ये उमेदवार आहेत. त्यांच्या नावाची घोषणा स्वतः राष्ट्रीय नेते खासदार अससोद्दीन ओवेसी यांनी स्वतः केली. परंतु शहर उत्तर मध्ये पक्षाचा युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर याने बंडखोरी करत अर्ज भरला आहे. दुसरीकडे माजी नगरसेवक गाझी जहागीरदार हा सुद्धा नाराज असल्याचे दिसून येते, त्याने मध्य मधून उमेदवारी अर्ज नेला होता पण त्याचा बार फुसका निघाला. माजी नगरसेवक अझहर हुंडेकरी यांनीही दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आपला अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधात सोलापुरात एमआयएम चा उमेदवार द्यायचा नाही असा निर्णय अध्यक्ष शाब्दी यांनी घेतला आहे त्याचे मुस्लिम समाजातून स्वागत झाले, त्यांच्या निर्णयाचे कौतुक झाले. त्यामुळे शहर मध्य मतदारसंघात सध्या तरी राष्ट्रीय पक्षाकडून शाब्दी हे एकमेव मुस्लिम उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील मुस्लिम मतदार तसेच समाजात असलेल्या भावना पाहता शाबदी यांना चांगले वातावरण आहे असे असताना हे कार्यकर्ते जाणीवपूर्वक अध्यक्षांना त्रास होईल असे वागत असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.
अजहर हुंडेकरी यांनी मात्र शाब्दि यांना अडचण नाही झाली तर आपण अर्ज काढू असे स्पष्ट सांगितले आहे. पण मोहसिन मैंदर्गीकर हे ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत. गाझी जहागीरदार हे उमेदवारी अर्ज भरण्यावेळी उपस्थित नव्हते. लोकसभेमध्ये त्यांनी भाजपला मदत व्हावी म्हणून केलेले कृत्य याबद्दल मुस्लिम समाजात त्यांच्या बाबत नाराजी आहे.
फारुख शाब्दी यांना तर उत्तर आणि दक्षिण मध्ये पक्षाचा उमेदवार द्यायचा नाही त्यामुळं आता येत्या दोन दिवसात ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.