पालकमंत्री जयकुमार गोरे, राम सातपुते यांच्याकडून कोठे कुटुंबियांचे सांत्वन
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे शाही स्नान करताना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. कोठे यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी रात्री कोठे यांच्या मुरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थानी जाऊन कोठे परिवाराचे सांत्वन केले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, अनेक दशकांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले माजी महापौर महेश कोठे हे सोलापूरच्या राजकारणातील, समाजकारणातील लोकप्रिय नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. महेश कोठे यांच्या निधनामुळे कोठे परिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी काळात कोठे परिवाराच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहू, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी त्यांनी आमदार देवेंद्र कोठे, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, प्रथमेश कोठे आणि कोठे परिवाराशी चर्चा करून त्यांना धीर दिला.
या सांत्वनपर भेटीप्रसंगी माजी आमदार रामभाऊ सातपुते, आमदार देवेंद्र कोठे, डॉ.सूर्यप्रकाश कोठे, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे,भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार – पाटील, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, गुरुशांत धुत्तरगावकर, विठ्ठल कोटा, मेघनाथ येमुल, कुमुद अंकाराम, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, युवराज सरवदे, अक्षय वाकसे, तुषार पवार, अक्षय अंजिखाने, परशुराम भिसे, मारुती नल्ला आदी उपस्थित होते.