पालकमंत्र्यांचे ‘दिलखूष’ झाले ; सुरेश पाटलांनी असे काय केले !
सोलापूर – सोलापूर शहर उत्तर मतदार संघातील प्रभाग क्रमांक ३ येथील भवानी पेठ परिसरातील भवानी पेठचा मानाचा राजा अशी ख्याती असणाऱ्या दिलखुष गणेशोत्सव तरुण मंडळाच्या श्रींचे आरती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात संपन्न झाले. भाजपाचे ज्येष्ठ नेते सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या विनंतीला मान देऊन पालकमंत्री पहिल्यांदाच भवानी पेठ येथील सुरेश पाटील यांच्या निवासस्थानासमोरील गणेश पूजेच्या निमित्ताने आले होते.
याप्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर, युवा नेते बिपिन पाटील, बाबुराव जमादार, भाजपा मंडलाध्यक्ष अक्षय अंजीखाने, दिलखुश मंडळाचे उत्सव अध्यक्ष संतोष कोळी, आदींची उपस्थिती होती.
दरम्यान कर्नाटक राज्यातील विजयपूर येथील श्री सन्मुखानंद मठाचे मठाधिपती श्रो.ब्र.श्री.सद्गुरु अभिनव सिद्धारूढ अप्पाजी, सोलापूर विमानतळ परिसरातील शांतीनगर श्री श्री श्री सद्गुरु बसवारुढ मठाचे मठाधिपती श्रो.ब्र.श्री. शिवपुत्र अप्पाजी, मैंदर्गी विरक्त मठाचे मृत्युंजय महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात विधिवात धार्मिक मंत्रोपचारात पालकमंत्र्यांच्या हस्ते श्रींची पूजा संपन्न झाली.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांनी केले तर उपस्थित महास्वामीजींच्या हस्ते पालकमंत्री आमदार व अन्य मान्यवरांचे सन्मान करून त्यांनी शुभाशीर्वाद दिले. दिलखुष मंडळाचे यंदाचे 49 वे वर्ष असून गेल्या 25 वर्षापासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
यामध्ये विशेषत: भक्तांसाठी महाप्रसादाच याला प्राधान्यक्रम दिला. मंडळाचे पुढच्या वर्षी 50 वर्षे पूर्ण होणार असून पन्नास वर्षांमध्ये अनोखे उपक्रम मंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या वर्षभरात राबवण्यात येणार आहे डॉल्बीमुक्त मिरवणूक याला आम्ही देखील प्राधान्य देत असून आम्ही डॉल्बीमुक्त समर्थनात असल्याचे मंडळाचे आधारस्तंभ ज्येष्ठ मार्गदर्शक गंगाराम डोळ्ळे यावेळी सांगितले.
दरम्यान पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सुरेश पाटलांच्या निमंत्रणाला मान देऊन भवानी पेठ येथे गणेश पूजेच्या निमित्ताने उपस्थिती लावली यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
सुरेश पाटील त्यांचे कार्य संघटनात्मक असून भाजप पक्ष बळकटणीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे याचा विचार करत आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो पाटील यांचे असेच कार्य भाजप पक्ष संघटनेसाठी फायदेशीर ठरेल अशी आशा देखील यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली.
यावेळी मंडळाचे जेष्ठ मंडळी सिद्रारामय्या पुराणिक, बंडोपंत डोळे, बसवराज जाटगल, नरसप्पा मंदकल, निंगाप्पा पुजारी, कृष्णाप्पा कोलकर, शरणाप्पा डोळे, गंगाराम डोळे, सायबण्णा मुडल, सिद्रामप्पा तेगेळ्ळी, अब्बास तांबोळी यांच्यासह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत पुराणिक, अंबादास कन्ना, गणेश वंगा, अनिल पाटील, मल्लू कोळी, अक्षय पाटील, सिद्राम डोळे, विनायक पाटील, शंकर कोळी, प्रभू कोळी, मल्लिकार्जुन करली, प्रवीण डोळे, विनायक डोळे, देवराज पाटील ,अफसर नालवार,बापू कंटीकर, राघवेंद्र बद्दल, राजेश बट्टू, यांच्यासह दिलखुष मंडळाचे पदाधिकारी आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.