सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे अडचणीत ; काय आहे प्रकरण
सोलापूर- मराठा सेवा मंडळ संचलित, छत्रपती शिवाजी हायस्कुल सोलापूर येथील शिक्षिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस स्टेशन येथे सोलापूरचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोहर गणपत सपाटे रा.निराळे वस्ती, सोलापूर याचेविरुद्ध दाखल प्रकरणात पोलिसांनी सपाटेला निर्दोष ठरविणारा ब समरी अहवाल न्यायालयात दाखल केलेला होता, तो फेटाळून त्यामध्ये फौजदार चावडी पोलिसांनी पुढील तपास करण्याचा आदेश मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर. के.जंगम सो यांनी पारित केला.
यात हकिकत अशी की ,
पीडिता ही मराठा समाज सेवा मंडळ संचलित, छत्रपती शिवाजी हायस्कुल, सोलापूर येथे शिक्षिका म्हणुन नोकरीस होती, त्यानंतर सन १९९३ मध्ये संस्थेचे अध्यक्ष तथा तत्कालीन महापौर मनोहर सपाटे हा झेंडा वंदनसाठी शाळेत आला होता. झेंडा वंदन झाल्यानंतर मनोहर सपाटे यांने तिला छत्रपती शिवाजी शाळेच्या कार्यालयात बोलावून घेतले आणि “मी या संस्थेचा अध्यक्ष व महापौर आहे, तु मला खूप आवडतेस, असे ही तू ऐन जवानीत विधवा झाली आहेस, त्यामुळे तू माझ्याशी शरीरसंबंध ठेव, मी तुझ्याबरोबर लग्न करतो आणि जर तू माझ्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला किंवा ही गोष्ट कोणाला सांगीतली तर मात्र मी तुला नोकरीतून काढून टाकून खल्लास करीन” आशी धमकी देवून पिडीतेवर सर्वात प्रथम दि. १५ ऑगस्ट १९९३ रोजी तिचे इच्छेविरूध्द बळजबरीने अत्याचार केला.
तसेच पिडीतेसोबत अनैसर्गीक कृत्य केले. त्यानंतर मनोहर सपाटे याने नोकरीवरून काढण्याची व जीवे मारण्याची धमकी देवून व लग्नाचे आमीष दाखवून पिडीतेवर शिवपार्वती लॉज येथे तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केले तसेच तुझे आणि माझे अनैतिक संबंध आहेत हे तुझ्या नातेवाईकांना सांगतो व तुझे आणि माझे काही व्हीडीओ आहेत ते मी तुझ्या भावाला दाखवितो म्हणून पिडीतेकडून सन-२०२० मध्ये पिडीतेचा नोकरीचा राजीनामा लिहून घेतला व निवृत्तीचे पैश्याची मागणी केली असता मनोहर सपाटे यांनी पिडीतेकडे दहा लाखची खंडणी मागीतली.
त्यावेळी पिडीतेने सपाटे यास घाबरून खंडणी दिली. त्याच प्रमाणे दि 28/06/2022 रोजी मनोहर सपाटे याने पिडीतेच्या इच्छेविरुद्ध वसंत विहार येथील संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज मंदिराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने अत्याचार केला अशा आशयाची फिर्याद पीडितेने फौजदार चावडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली होती.
सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी केला व त्यांनी दहा साक्षीदारांचे जवाब नोंदवून फिर्यादीने खोटा गुन्हा दाखल केला असा निष्कर्ष काढून मनोहर सपाटेविरुद्ध कोणताही पुरावा मिळून आलेला नाही असा ब समरी अहवाल न्यायालयात दाखल केला.
त्यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे अँड.संतोष न्हावकर यांनी हरकत अर्ज दाखल करून तपास अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक सपाटेच्या दबावाखाली तो अध्यक्ष असलेल्या ट्रस्टमधील फक्त सपाटेच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींचेच जवाब नोंदवून सपाटे यास फायदा होईल असा पुरावा तयार केल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. तसेच फिर्यादीची हकीकत खरी आहे असे सांगणाऱ्या साक्षीदारांनी पोलीस स्टेशनला अनेक हेलपाटे मारूनही त्यांचा पुरावा नोंदविणे व जवाब नोंदविण्याचे टाळले. त्याचप्रमाणे सपाटे स्वतःचे साक्षीदार पोलीस स्टेशनला घेऊन गेल्याचे व स्वतंत्र साक्षीदारांनी पोलीस स्टेशनला चकरा मारल्याचे शाबीत करण्यासाठी फिर्यादीने पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता ती जाणीवपूर्वक फेटाळून तो पुरावा पोलिसांनी नष्ट केल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले.
तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने पोलिसांचा अहवाल फेटाळून पुन्हा तपास करणेचा आदेश पारित केला आहे. त्यामुळे फौजदार चावडी पोलिसांवर बरगंडे प्रकरणानंतर पुन्हा दुसऱ्यांदा नामुष्कीची वेळ ओढवलेली आहे.
यात मूळ फिर्यादीतर्फे अँड. संतोष न्हावकर, अँड. राहुल रुपनर, अँड.सोहेल शेख, अँड.शैलेश पोटफोडे काम पाहत आहेत.