बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास सरकारला भाग पाडले ; आडम मास्तर
सोलापूर – अत्यंत धोकादायक अशा बांधकाम उद्योगात पोटाची खळगी भरण्यासाठी बांधकाम कामगार ऊन, वारा,पावसाची तमा न बाळगता स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. अशा कामगारांना कोणतीच सामाजिक सुरक्षा आणि कामगार कायद्याचे संरक्षण नव्हते. अशातच कोल्हापूर येथे बांधकाम करताना एका कामगाराचा दुर्दैवी अपघात झाला झाला. त्यांना उपचारासाठी मुंबई दाखल केले. उपचारादरम्यान मृत्यू झाला.याची माहिती घेऊन विधी मंडळात प्रश्न उपस्थित करून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास सरकारला भाग पाडले. बांधकाम धारकांकडून एक टक्का सेस घेऊन त्या सेस मधून बांधकाम कामगारांना लाभ देण्याची तरतूद करायला लावले.त्यामुळे आज महाराष्ट्रातील सबंध कामगारांना लाभ मिळत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी केले.
शुक्रवार 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लाल बावटा बांधकाम कामगार युनियन च्या वतीने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मार्फत प्रत्येक नोंदीत कामगारांना 17 प्रकारच्या 30 नगांचे गृहउपयोगी वस्तूंचा संच देण्यात येते त्या संचाचे वितरण कार्यक्रम माकपच्या माजी नगरसेविका कॉ.कामिनी आडम यांच्या अध्यक्षतेखाली मोदी येथील मसिहा चौक येथे पार पडला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात कामिनी आडम म्हणाल्या की, आता कोणत्याच क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही.सर्वच क्षेत्रात महिलांना आपला कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.ही अभिमानास्पद गोष्ट आहे.अशा शब्दात महिला दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी व्यासपीठावर शंकर म्हेत्रे, प्रा.अब्राहम कुमार,अमित मंचले, मरेप्पा फंदीलोलू डॉ.नोवेल अनमोल , ॲड.अनिल वासम, पा. डेव्हिड मंचले,बेंजामिन बळगेरी , प्रा. देवपुत्र कुरकल्ली, येसुदास भंडारे, इमॅन्युएल भंडारे, हेबेल जगले, याकोब जगले, मार्क जगले, मोजेश तिप्पलदिनी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अब्राहम कुमार यांनी केले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड अनिल वासम यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय भंडारी, सिमोन पोगुल, टोनी जगले, नॅथन बुरले, सुनील काडे, सुरेश फरड, पिंटू भंडारी, जेम्स तिपल्लदिनी आदींनी परिश्रम घेतले.