कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी गायले ; “ओम नमो तथागता, नमोस्तु गौतमा” हे गीत
विश्वरत्न डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर यांची जयंती जिल्हा परिषद सोलापूर येथे पार पडली. अध्यक्षस्थानी सीईओ मनीषा आव्हाळे या होत्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह इतर सर्व अधिकारी उपस्थित होते. समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या समाज कल्याण विभागाने अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता.
मराठा सेवा संघ व कास्ट्राईब संघटना यांनी संयुक्तपणे भीम गीतांचा जोरदार कार्यक्रम घेतला. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांना या महामानवाच्या जयंतीला गाणे म्हणण्याची संधी “स्वानंद ग्रुप “मार्फत देण्यात आली.
सुधीर फडके यांनी गायलेल्या या गीताची रचना वसंत बापट यांची व संगीतकार महाजन यांचे “ओम नमो तथागता, नमोस्तु गौतमा” हे गीत संतोष कुलकर्णींनी यशवंतराव चव्हाण सभागृहात मनापासून गायले.
समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या मनात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक आगळे वेगळे स्थान आहे. सुधीर फडके यांचे भीम गीत हे गौतम बुद्धांच्या व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीचे सार असल्याच्या भावना कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. “वाचाल तर वाचाल” अशी शिकवण देणाऱ्या थोर महामानवाला त्यांनी त्रिवार अभिवादन केले.
खरंच कुलकर्णी सरांच कौतुक करावं तेवढं कमी आहे. कुलकर्णी परंतु…..बहुजनवादी कुलकर्णी. आपण सर्व प्रथम माणूस अहोत….मग नंतर आपले जात धर्म. आज डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जयंती दिनी अतिशय सुंदर भीम गीत सादर केले. स्वर्गीय ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे यांची आठवण झाली. सर जी…. खूप छान…. जय भीम
राजगुरू,
सहायक लेखा अधिकारी बांधकाम२
जि प सोलापूर