
आरिफ शेख – विनोद भोसले यांच्यात पुन्हा हाय व्होल्टेज लढत ; “भाई, इस बार मेरी बारी”
सोलापूर : 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत जी राजकीय समीकरणे होती त्याचा पूर्णत: उलट राजकीय समीकरणे पाहायला मिळत आहेत. जे मागच्या निवडणुकीत एकत्र लढले होते आता ते एकमेकांच्या विरोधात उभे आहेत परंतु एक लढत मात्र पुन्हा त्या दोघांमध्येच होत आहे.
ती म्हणजे माजी महापौर आरिफ शेख आणि माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यात. 2017 वेळी विनोद भोसले हे काँग्रेसचे उमेदवार होते अन् आरिफ शेख यांना भाजपने उमेदवारी दिली होती पण यंदा उलटे असून आरिफ हे काँग्रेस कडून उमेदवार आहेत तर विनोद हे भाजपचे. त्यावेळी भोसले यांनी शेख यांचा पराभव केला होता.
मैदान तेच आहे, खेळाडू पण तेच असून पक्ष मात्र बदलले आहेत. राजकीय वातावरण साधारण मागच्या निवडणुकी सारखे असून त्यावेळी प्रणिती शिंदे आमदार होत्या आता देवेंद्र कोठे आहेत.
त्यावेळी स्वतः धर्मा भोसले असल्याने विनोदचा विजय सोपा झाला होता आता देवेंद्र आणि जयकुमार गोरे पाठीशी आहेत. इकडे सर्वसाधारण प्रवर्गातून काँग्रेसकडून स्वतःला उमेदवारी मिळवण्यात आरिफ शेख यशस्वी ठरले. आता मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मते मिळाली तर आरिफ शेख यांचा विजय सोपा होईल त्यामुळे या निवडणुकीत आता आरिफ शेख हे मागील पराभवाचा बदला घेणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.






















