जिल्हा लेबर फेडरेशनच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेना युवाप्रमुखाचा पराभव ; अरुण थिटेंचे नशीब चमकले चिठ्ठीत
सोलापूर : सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या 18 संचालक जागेसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीमध्ये दहा जागा या बिनविरोध झाल्या तर आठ जागेसाठी निवडणूक लागली होती. त्यासाठी रविवारी रॉजर्स इंग्लिश मिडीयम स्कूल याठिकाणी मतदान झाले तर तिथेच सायंकाळी मतमोजणी करण्यात येऊन निकाल घोषित करण्यात आला. या निवडणुकीत 466 मतदारांपैकी 385 मतदारांनी मतदान केले. जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक आबा गावडे यांनी काम पाहिले.
या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा युवा प्रमुख प्रियदर्शन साठे यांचा दोन मतांनी पराभव झाला त्यांचा पराभव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत शिंदे यांचे चिरंजीव यशवंत शिंदे यांनी केला तर माळशिरसच्या जागेसाठी समान तेरा मते पडली ही निवड चिट्टीवर घेण्यात आली त्यामध्ये अरुण थिटे यांचे नशीब चमकले आणि ते संचालक झाले.
बिनविरोध झालेल्या सर्वसाधारण जागेमध्ये
सोलापूर शहर – शंकर चौगुले, चंद्रकांत अवताडे,
दक्षिण सोलापूर – मुजम्मिल हुसेन शेख
उत्तर सोलापूर- राजू हरिश्चंद्र सुपाते
मोहोळ -शिवाजी चव्हाण
मंगळवेढा -श्याम पितांबर पवार
अक्कलकोट -रोहिदास राठोड
करमाळा -मानसिंग नारायण खंडागळे
बार्शी -अरुण वामनराव घोडके
भटक्या विमुक्त जाती जमाती
संजय नामदेव साळुंखे यांचा समावेश होता.
सर्वसाधारण जागेमध्ये माढा, सांगोला, पंढरपूर व माळशिरस या चार जागेसाठी निवडणूक लागली होती.
माढा मतदारसंघातून मिळालेली मते
यशवंत भारत शिंदे 21
प्रियदर्शन अण्णासाहेब साठे 19
सांगोला मधून मिळालेली मते
अंकुर भीमा येडगे 09
बाबासाहेब रामचंद्र करांडे 23
माळशिरस मधून मिळालेली मते
नितीन चंद्रकांत शिंदे 13
अरुण भगवान थिटे 13
पंढरपूर मधून मिळालेली मते
रेश्मा संजय साठे 16
पुनम राहुल कौलगे पाटील 02
बाळासाहेब जालिंदर बागल 22
महिला प्रवर्गाच्या दोन जागेसाठी मिळालेली मते
सरस्वती अनंत साठे 254
रेश्मा संजय साठे 73
पुनम राहुल कौलगे पाटील 92
पार्वती विजय गाडे 267
ओबीसी प्रवर्गातील एक जागेला मिळालेली मते
सदानंद श्रीपती फुले 86
वसंत कुबेर क्षीरसागर 296
अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी
लक्ष्मण कामू मस्के 299
रमेश घनश्याम वाघमारे 82
आता अशी आहेत राजकीय समीकरणे…
जिल्ह्यातील नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले, दिलीप माने यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्यांनी दहा जागा बिनविरोध करण्यात यश मिळवले. दक्षिण सोलापूरसाठी मुजम्मिल शेख यांना बिनविरोध करण्यात काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांनी वाटा होता परंतु त्या त्या तालुक्यातील गटबाजी मुळे ही निवडणूक लागली. एकूणच निकाल पाहता आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाचे आठ संचालक आहेत तर आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने यांच्या गटाच्या ही आठ जागा होतात त्यामुळे आता दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट च्या दोन जागेवर बरेच काही अवलंबून आहे. अक्कलकोटचे सिद्धाराम म्हेत्रे समर्थक मल्लिकार्जुन पाटील व दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे हे आता चेअरमन निवडीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.