दिलीप स्वामी छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकारी पदी जॉईन ; पदभार घेताच मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजी नगर : सोलापूर जिल्हा परिषदेचे तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता त्यांनी प्रभारी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडून पदभार घेतला. श्रीकांत यांनी स्वतः त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसवले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले.
माध्यामांशी बोलताना जलद, गतिमान, पारदर्शक, संवेदनशील काम राहील, नागरिकांना या ठिकाणी कोणतीही अडचण होणार नाही. यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करताना सोलापूर जिल्हा हा राज्यामध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर होता त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा राज्यात सर्वच बाबतीत पहिल्या क्रमांकावर राहील यासाठी प्रयत्न राहतील. हा जिल्हा पर्यटन व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे पर्यटनाला चालना देऊन रोजगार निर्मिती कशी वाढेल यासाठी ही प्रयत्न राहतील. आगामी लोकसभा निवडणूक आणि दुष्काळ उपायोजना करण्याला प्राधान्य राहील.
अन् ‘दिपाली रूपाली’ने पाहिला पप्पांचा ऑनलाईन पदभार सोहळा
छत्रपती संभाजी नगरच्या नूतन जिल्हाधिकारी पदी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पदभार स्वीकारला. बुधवारी त्यांची जिल्हाधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली त्यामुळे सोलापुरातील अनेकांना आनंद झाला. गुरुवारी जेव्हा ते जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार घेत होते तेव्हा त्यांच्या दोन्ही मुली रूपाली आणि दिपाली यांनी ऑनलाइन व्हिडिओ कॉल द्वारे आपल्या पप्पांचा पदभार सोहळा पाहिला, पप्पा जिल्हाधिकारी झाल्याचे पाहताना त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.