दिलीप माने भेटले जिल्हाधिकाऱ्यांना ; अनेक महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा
सोलापूर : सोलापूर शहर व उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात माजी आमदार दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन चर्चा केली.
सुंदरम नगर येथील जलतरण तलाव बंद अवस्थेत असून याची तातडीने दुरुस्ती करून हा जलतरण तलाव जुळे सोलापूर भागातील नागरिकांसाठी सुरू करण्याची मागणी माने यांनी केली. गतवर्षी जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे खरीप पिके पूर्णपणे जळून गेली. मात्र केवळ पाच तालुक्याच्या समावेश दुष्काळी तालुके म्हणून तर उर्वरित सहा तालुका यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही दुष्काळी मदत मिळाली नसल्याचे सांगून दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळू देण्याची मागणी केली.
हवामान खात्याचे अंदाज नुसार यावर्षी पर्जन्यमान चांगले सांगितले जात असून शेतकऱ्यांना खरीप पिके पेरणीसाठी आवश्यक असलेली खते उपलब्ध करून देण्याची मागणी केली. कुमठे (तालुका उत्तर सोलापूर) येथील लमान तांड्यावर 1200 मतदार असून मतदारांचे सोयीसाठी लामाण तांडा येथे मतदान केंद्र असणे आवश्यक असून येथील मतदार संख्या, परिसरातील वस्तीवरील मतदार यांच्या सोयीसाठी कुमठे लमान तांडा येथे मतदान केंद्र करण्याची मागणी केली. तर साखरेवाडी (तालुका उत्तर सोलापूर) या गावी सुमारे 700 मतदार असून या त्यांना 2.500 किलोमीटर अंतरावर कळमण या गावी मतदानास यावे लागते. त्यामुळे मतदार मतदानाचा हक्कापासून वंचित राहतात. त्यांचे सोयीसाठी साखरेवाडी येथे स्वतंत्र मतदान केंद्र करण्याची मागणी माने यांनी केली.
यावेळी गंगाधर बिराजदार, प्रथमेश पाटील, बाळासाहेब पाटील, संजय जाधव, उमेश भगत, ज्ञानोबा साखरे, महेश घाडगे, सतीश मस्के, गणपत बचुटे, नितीन भोपळे, अनिल हिबारे, रेवनसिद्ध साखरे, अजय बचुटे, सुनील जाधव, अजय सोनटक्के, मुजफ्फर जहागीरदार, गुरुबाळा पाटील, संजय लोणारी, रवींद्र पाटील, अमोगसिद्ध पाटील, अशोक कलशेट्टी, बसवराज पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.