अखेर दिलीप माने उतरले दक्षिणच्या मैदानात ! फोटो व व्हिडिओ आले समोर
सोलापूर : काँग्रेसचे बी फार्म न मिळाल्याने नाराज झालेले माजी आमदार दिलीप माने यांनी माघार घेतली होती पण त्यांनी कोणताही राजकीय निर्णय घेतला नाही दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा झाली नाही.
शेवटी दिलीप माने यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सकाळी एक व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडिओमध्ये दिलीप माने हे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा प्रचारात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी नंदुरपासून दिलीप माने यांच्या उपस्थितीत काडादी यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली आहे.
दिलीप माने हे काडादी यांच्या प्रचारासाठी उतरले असल्याने निश्चितच काडादी यांची ताकद वाढली आहे. दिलीप माने यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांची संपूर्ण मतदार संघात बांधणी आहे. शहरी भागात कार्यकर्त्यांचे मोठी ताकद आहे. ही सर्व ताकद आता काडादी यांना मिळणार आहे.
सोमवारी धर्मराज काडादी, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, भीमाशंकर जमादार, हरीश पाटील या सर्व नेत्यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची जनवात्सल्य या निवासस्थानी भेट घेतल्याचे माहिती मिळाली. मंगळवारी काडादी आणि हसापुरे यांनी दिलीप माने यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे समजले त्यानंतर यांच्या प्रचारातून करण्याचा निर्णय घेतला आहे. माने यांच्या निर्णयामुळे ना विकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांची अडचण झाली असून भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांच्याही टेन्शनमध्ये वाढ झाल्याचे बोलले जाते.