
दिलीप ‘मालकां’वर शुभेच्छांचा वर्षाव ;
सुमित्रा निवासस्थानी सत्काराला प्रचंड गर्दी
सोलापूर : माजी आमदार तथा सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सुमित्रा निवासस्थानी शुभेच्छा देण्याकरिता शहरातील राजकीय, सामाजिक, बँकिंग, शैक्षणिक, क्रीडा, वैद्यकीय, सहकार ,पणन, औद्योगिक, दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सरपंच, पत्रकारिता, क्षेत्रातील मान्यवरासह विविध क्षेत्रातील नागरिकांनी गर्दी केली होती.
पाच वर्षाच्या प्रचंड गॅप नंतर दिलीप माने यांना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद मिळाले आणि हे सभापतीपत्यांनी आपल्या ताकदीवर मिळवून दाखवले. त्यामुळे मालकांचा यंदाचा वाढदिवस कार्यकर्त्यांसाठी विशेष असा पाहायला मिळाला सर्व माध्यमांना मोठमोठ्या जाहिराती देण्यात आल्या. सुमित्रा या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
ढोल ताशाच्या गजरात अन् फटाक्याच्या आतशबाजीत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभापती दिलीप माने यांना क्रेनच्या सहाय्याने ७०० किलोचा हार घालून, ६५ किलो वजनाचा केक कापण्यात आला.
यावेळी सभापती माने यांना शुभेच्छा देण्याकरिता अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपिन पटेल, मनगोळी हॉस्पिटलचे डॉ. अरुण मनगोळी, व्ही.व्ही.पी. कॉलेजचे नानासाहेब चव्हाण, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, जिल्हाध्यक्ष जी. के. देशमुख, ॲड. वैभव देशमुख,
माढ्याचे माजी आमदार धनाजी साठे, माजी महापौर आरिफ शेख, तोफिक शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, परमानंद अलगोंड – पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी आमदार दिपक साळुंखे, माजी नगरसेवक शिवलिंग कांबळे, शैला राठोड, सुभाष चव्हाण, बाजार समितीचे माजी संचालक केदार उंबरर्जे, हरिदास टोणपे, सुहास जेऊरकर, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार, बापूराव पाटील ,कैलास भडोळे , दत्तात्रय भोसले, शेखर शेख, सुहास जाधव, सुधीर बनसोडे, माजी गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, अनिल राऊत, बाजार समितीचे सचिव अतुल राजपूत, बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, संचालक, नागांण्णा बनसोडे, प्रथमेश पाटील, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीशैल रणधीरे, बाजार समिती संचालक अविनाश मार्तंडे ,वैभव बरबडे, मुस्ताक चौधरी, गफार चांदा, माजी संचालक इटकळे, प्रकाश चोरेकर, , ऑइल मिल संघटनेचे अध्यक्ष महालिंगआप्पा परमशेट्टी, दलाल असोसिएशनचे अध्यक्ष श्रीशैल अंबारे, अष्टभुजा देवी पंचकमिटी चे अध्यक्ष सिद्धया हिरेमठ, माजी नगरसेवक दादाराव तातमोगे , ब्रह्मदेव दादा माने बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड, व्हाईट चेअरमन दिगंबर मेटे, सचिन चौधरी, गंगाधर बिराजदार, तानाजी शिंगारे रमेशसिंग बायस ,शावरू वाघमांरे , आनंदराव देठे, श्रीकांत बंडगर, माजी सभापती रजनी भडकुंबे, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, काशिनाथ गौडगुंडे, महिला सरपंच परिषदेच्या अध्यक्ष कविता घोडके — पाटील, रुक्मिणी केंगार, प्रिया पाटील, जगन्नाथ बैसे, ऍड इंद्रजीत पाटील, सुरेश फलमारी, माजी महापौर अलका राठोड, नलिनी चंदेले, शिवसेनेचे माजी नगरसेवक शिवसिंग आंबेवाले, तळे हिप्परग्याचे अनिल रेवजे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.