आई तुळजाभवानी माते, सुनेत्रा वहिनींना दीर्घायुष्य लाभो ; सोलापूरच्या भाऊंनी घातले साकडे
सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी ईच्छा भगवंताची परिवारातर्फे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर येथील मंदिरात देवीस अभिषेक व धार्मिक विधिवत पूजन करून खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो असे साकडे घातले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबीयांच्या वतीनं महाराष्ट्राच्या विकासात्मक सेवा त्यांच्या हातून घडो अशी प्रार्थना सुद्धा करण्यात आली. तसेच यावेळी सुनेत्रा वहिनी पवार यांना व्हिडिओ कॉल द्वारे तुळजाभवानी मातेचे थेट दर्शन घडवण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी प्रदेशचे नेते प्रमोद हिंदुराव, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड, निलेश कांबळे, सचिन गुत्तेदार, उमेश जाधव, माणिक कांबळे, महादेव राठोड, आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती.
किसन जाधव यांनी सुनेत्रा वहिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या या कार्याची प्रशंसा केली जात आहे. यावेळी किसन जाधव यांनी तुळजापूर येथून बारामती येथील सहयोग बंगला या निवासस्थानी जाऊन सुनेत्रा वहिनी पवार यांना श्री तुळजाभवानी मातेचे अभिषेक आणि महाप्रसाद सुपूर्द करून आणि खास दिवाळीच्या निमित्ताने बैलगाडीचे प्रतीक असणारे ड्रायफ्रूट्स भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या आणि दीपावली निमित्त शुभेच्छा दिल्या.
राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच पवार कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे निधन झाल्यामुळे खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांनी आपला वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला होता परंतु किसन जाधव यांच्या प्रेमापोठी त्यांनी श्री तुळजाभवानी मातेचे प्रसाद आणि अभिषेक स्वीकारले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांचा देखील किसन जाधव यांनी भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.