देवेंद्र सोलापूर महानगरपालिकेचे कसे, मुख्यमंत्र्यांनी कोठेंना आवर्जून विचारले
काल पुणे येथे भारतीय जनता पार्टीची पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधला,याप्रसंगी महानगरपालिकेबाबत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी निवेदन केल्यानंतर,त्यांच्या बाजूला बसलेलेले आमदार देवेंद्र कोठे यांना मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सोलापूर महानगरपालिकेच्या सध्या असलेले पक्षीय बलाबल, व आगामी नियोजन बाबत आवर्जून विचारपूस केली
आजपर्यंत सोलापूर महानगरपालिका व कोठे हे समीकरण सोलापूर शहराने अनेक वर्षांपासून पाहत आलेले असून,पूर्वी स्वर्गीय विष्णुपंत कोठे व स्वर्गीय महेश कोठे यांनी सर्व महापालिकेची सूत्रे सांभाळली असून,आता कोठे कुटुंबातील आमदार देवेंद्र कोठे भाजपकडे असल्याने भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने,मुख्यमंत्र्यांनी आवर्जून विचारपूस केली असावी अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळाली……….