फडणवीसांप्रमाणेच सोलापूरचे ‘देवेंद्र’ उच्च पदाकडे जातील ; जगद्गुरूंचे मिळाले आशीर्वाद
सोलापूर – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडवणीस यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना ५४ हजार वह्या वाटप या सेवाकार्य कार्यक्रमाचा शुभारंभ काशीपीठ जगद्गुरु श्री डॉ मल्लिकार्जुन विश्र्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य माध्यमिक हायस्कूल, अक्कलकोट रोड सोलापूर येथे सोमवारी श्री १००८ काशीपीठ जगद्गुरु श्री डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, उपाध्यक्ष श्रीनिवास करली, भूपती कमटम, श्रीनिवास दायमा, प्रभाकर गणपा, मारेप्पा कंपली, दत्तात्रय पोसा, श्रीनिवास जोगी, अविनाश बेंजरपे, श्रीनिवास पुरुड, सिद्धाराम खजुरगी, रवीसिंग बुरानपुरे तसेच संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी व मुख्याध्यापक म्हमाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या आशीर्वचनपर मनोगतात जगद्गुरु डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, समाजाची गरज लक्षात घेऊन सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या नेतृत्वाची समाजालाही आवश्यकता असते. तात्यांचा वारसा घेऊन गरजवंतांसाठी पुढे येणाऱ्या देवेंद्र कोठे यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, ज्यांचा वाढदिवस आहे ते देवेंद्र फडणवीस आणि जे स्तुत्य उपक्रम राबवीत आहेत ते देवेंद्र कोठे या दोघांमध्ये नामसाधर्म्य आहेच, समाज हिताचे असेच कर्म देवेंद्र कोठे यांनाही निश्चित उच्च पदाकडे घेऊन जाईल.
याप्रसंगी प्रास्ताविकपर भाषणात ५४ हजार वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजक, भाजपा युवा नेते देवेंद्र कोठे म्हणाले, माझे आजोबा स्व. विष्णुपंत कोठे नेहमी म्हणायचे की डोक्यात ३६५ दिवस राजकारण ठेवू नये. निवडणुकीपुरते राजकारण करावे आणि उर्वरित दिवसांमध्ये आपल्या राजकीय पदाचा लाभ सर्वसामान्य गोरगरिबांना करून देण्यासाठी झटत राहावे. त्याच तत्वाचा आचरण करत मी उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रमाने करतोय याचं समाधान वाटतं. बृह्णमठ होटगी पीठातील भक्तांसाठी गुरुपरंपरेतून निर्माण झालेले हे ध्यानमंदिर या उपक्रमाच्या शुभारंभासाठी उपलब्ध झाले हे देखील मी माझे भाग्य समजतो असेही कोठे म्हणाले.
यावेळी त्यांनी स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. पुढील पंधरा दिवस शहरातील विविध शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा करणार असल्याचे सांगितले. शिवाय काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी हे आम्हां सर्वांचे प्रेरणास्त्रोत आहेत, महास्वामीजींच्या आशीर्वादाने वेगळीच ऊर्जा मिळाली असेही ते म्हणाले.
सदर कार्यक्रमास भाजपा चिटणीस नागेश सरगम, बजरंग कुलकर्णी, सुधाकर नराल, नागनाथ सोमा, मनोहर इगे, श्रीनिवास पोतन, रवी भवानी, मनोज कलशेट्टी, अभिषेक चिंता, अंबादास सकिनाल, धुळप्पा आळंद, सुनील अरळीकट्टी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सदस्य यशवंत आंदेवाडी, सुरजसिंह चौहान, पवन खांडेकर, सिद्धेश्वर कमटम, आकाश पडवळकर, रोहन जाधव,अश्विन कोडम, पवन यन्नम, शैलेश कडदास, अमन दुबास, उदय कनकी, विक्रम कंबळी, सोमेश येलगेटी, बंटी कटकम,श्रीनिवास म्याडम पंतलु,अमोल कोंड्याल, त्रिमूर्ती बल्ला, राहुल गोयल,गजानन केंगनाळर आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सदस्य त्याचबरोबर विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.