देवेंद्र भंडारे अध्यक्षपदाचा राजीनामा द्या ; तुम्ही स्वार्थी आहात ; काँग्रेसचे मोची नेते आक्रमक ; पाच गेले पण पन्नास आले
काँग्रेस पक्षाच्या मोची समाजातील माजी पाच नगरसेवकासह काही पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हा काँग्रेसला धक्का मानला जात आहे.
दरम्यान सोलापूर शहरातील काँग्रेस प्रेमी मोची समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. प्रमोद यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, प्राध्यापक नरसिंह असादे, माजी नगरसेविका आशा म्हेत्रे, बसवराज म्हेत्रे, दिनेश म्हेत्रे, हनुमंत सायबोळू, नागेश म्हेत्रे, शाम केंगार, अंजन मिसालोलू, रमेश फुले, राजू खडकीकर, शंकर सानुपागुल यांच्यासह समाजातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेमगड्डी म्हणाले, प्रवेश करतेवेळी देवेंद्र भंडारे यांनी जांबमुनी मोची समाजाच्या लेटर पॅडचा गैरवापर केला आहे. त्यामुळे काँग्रेस प्रेमी मोची समाजाने बैठक घेऊन तीव्र शब्दात देवेंद्र भंडारे व त्यांच्यासोबत गेलेल्या मोची समाजातील माजी नगरसेवकांचा निषेध केला आहे.
वास्तविक समाजाच्या बैठकीत समाजाचे लेटर पॅड, बॅनर या गोष्टी निवडणुकीत कुमारी समाजातील कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते वापरू नये असा निर्णय अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत ठरविण्यात आला असताना, शिवाय अशा प्रकारचा संदेश प्रसार माध्यमातून अध्यक्षांच्या नावानिशी व्हायरल झालेला आहे, असे असताना स्वतः पदसिद्ध अध्यक्षांनी लेटर पॅडचा गैरवापर करून नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे देवेंद्र भंडारे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मोची समाज शहर जिल्हा अध्यक्ष पदाचा स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मागणी समाजाच्या बैठकीत करण्यात आली आहे.
वास्तविक पाहता स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपा पक्षामध्ये देवेंद्र भंडारे व इतर नेते प्रवेश केलेले आहेत. त्याचा मोची समाजाशी काहीही संबंध नाही.
मोची समाजामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते काम करत आहेत व फक्त समाजकार्यासाठी एकत्र येतात देवेंद्र भंडारे यांनी घेतलेला निर्णय संपूर्ण मोची समाजाचा निर्णय नसून तो मोची समाजाला मान्य नाही.
आसादे व सायबोळू यांनी पाच गेले पण पण पन्नास आले असे सांगत स्वतःच्या स्वार्थापोटी पक्ष बदलण्याचा निर्णय हा वैयक्तिक निर्णय आहे याचा मोची समाजाशी काहीही संबंध नाही. बहुसंख्य काँग्रेस प्रेमी मोची समाज बांधव प्रचंड मतांनी शहर मध्य काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन पंडित नरोटे यांना निवडून आणण्याचा निर्धार एकमताने बैठकीत करण्यात आला असल्याचे सांगितले.