घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होवून एकाच घरातील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर या गावी घडली होती. स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण घरच जमीनदोस्त झाले
त्या दुर्घटनेत सोनाली बोळूरे आरुषी बोळूरे, मलिका सिद्ध बोळूरे, आणि शावर सिद्ध बोळूरे असे या स्फोटात गंभीररित्या जखमी झाले होते, एका चिमुकलीचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
या दुर्घटनेत पूर्ण बोळूरे कुटुंब घर जमीनदोस्त झाल्याने रस्त्यावर आले होते. या कुटुंबाने सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उद्योजक युवराज राठोड यांची भेट घेतली. कोणत्याही क्षणाचा विचार न करता युवराज राठोड यांनी तातडीने बोळूरे कुटुंबाला आर्थिक मदत दिली. यावेळी हत्तुर गावातील शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सत्तूबर सह इतर मान्यवर उपस्थित होते. राठोड यांचे दातृत्व पाहून सत्तूबर यांनी आभार व्यक्त केले.