दक्षिणचे इच्छुक सोमनाथ वैद्य यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट ; वैद्य झाले भाजपचे सक्रिय सदस्य
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात अनेक घडामोडी घडत आहेत. दक्षिण मध्ये काँग्रेस कडून इच्छुकांची संख्या सर्वाधिक असून आता भारतीय जनता पार्टी कडून इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये सोमनाथ वैद्य यांच्या नावाची ही भर पडली आहे.
काही दिवसांपूर्वी सोमनाथ वैद्य यांना भारतीय जनता पार्टीच्या माजी सहा ते सात नगरसेवकांनी पाठिंबा पत्र देऊन त्यांनादक्षिणमधून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. त्या पत्रानंतर भारतीय जनता पार्टीच्या त्या नगरसेवकांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली.
आता सोमनाथ वैद्य थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पोहोचले आहेत त्या ठिकाणी ते भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य झाले आहेत. तसेच त्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी कडून विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. मागील दोन महिन्यांपासून सोमनाथ वैद्य यांनी लक्ष्मी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या नावाची चर्चा घडवून आणली आहे त्यामुळे आता दक्षिण मध्ये प्रत्येकांच्या तोंडून सोमनाथ वैद्य हे नाव निघत असल्याने त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली तर निश्चितच त्यांना फायदा होईल अशी चर्चा आहे.