स्वातंत्र्यदिनी पारधी आणि टकारी समाजाला आणले एकत्र ; युवराज जाधव यांचा उपक्रम
सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर १ वांगी रोड येथे दादाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट ७९ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या पारधी समाज अध्यक्ष पारूताई काळे यांच्या हस्ते संस्थेचे आधारस्तंभ टकारी समाजातील जेष्ठ नारायण जाधव यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
काही दिवसांपूर्वी दोन समाजामध्ये वाद झाला होता, तो मिटावा यासाठी युवराज जाधव यांनी पुढाकार घेत ध्वजारोहण समारंभाला एकत्र बोलावले त्यात त्यांना यश आल्याचे पाहायला मिळाले.
त्यावेळेस संस्थापक अध्यक्ष युवराज जाधव रमेश जाधव बालाजी जाधव सहाय्यक पो.फैजदार विकास रोकडे हेडकॉन्स्टेबल नंदू राठोड चंदाताई काळे सायबु गायकवाड सुरेश गायकवाड ज्ञानेश्वर जाधव बुवा सुरेश शिवशरण अविनाश जाधव सर अंबादास जाधव बप्पा जाधव अनिल जाधव राघवेंद्र जाधव विवेक जाधव संतोष गायकवाड आकाश गायकवाड मधुकर गायकवाड बसवराज गायकवाड सागर गायकवाड व परिसरातील शालेय बाल विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.