सोलापूरसह संपुर्ण महाराष्ट्र व कर्नाटक फलंदाजीत मंद्रुपचा चमकणारा एक अद्वितीय तारा आज निखळला. मंद्रूपसह परिसरात क्रिकेट खेळात राज्य स्तरावर नावलौकिक मिळवून दिलेला तसेच राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असणारे मुन्ना शेख यांचे आज निधन झाले.
मुन्ना शेख हे गेल्या एक महिन्यापासून आजारी होते तर त्यांच्यावर सोलापुर येथील अश्विनी रूग्णालयात उपचार सुरू होते, उपचारा दरम्यान त्यांचे आज दुपारी चार च्या दरम्यान निधन झाले.
पंचक्रोशीत मुन्ना शेख यांना क्रिकेटचा बादशहा म्हणून ओळखले जात होते त्यांच्या अचानक जाण्याने मंद्रूपसह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.