कोरोना महामारीत उत्कृष्ट सेवा दिलेल्या डॉक्टर योगेश पल्लोलू यांना पुन्हा सेवेत घ्या ; बेमुदत उपोषण सुरू
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागात 2014 सालापासून कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू यांच्यावरील कोरोना महामारीचे अस संबंधित व नियुक्ती नसलेले ठिकाणची चुकीचे एकच कारण सांगून सेवा समाप्तीने दुसऱ्यांदा अन्यायकारक कारवाई झालेली कारवाई रद्द करून पूर्ववत महापालिका आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदावर रुजू करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
डॉक्टर योगेश पल्लोलू यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये अतिशय चांगले काम केले असतानाही तत्कालीन महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दोन वेळा निलंबित केले. मात्र 2021 मध्ये पुन्हा त्यांना फेरनियुक्ती पत्र देण्यात आले होते. परंतु मार्च 2022 मध्ये पूर्वीचेच कारण समोर ठेवून तत्कालीन आयुक्त शिवशंकर यांनी सेवा समाप्तीची कारवाई केली.
परंतु पल्लोलू त्यांच्यावर झालेली कारवाई बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याचे दिसून येते. महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांना चार वेळा विनंती अर्ज देऊनही त्या दखल घेत नाहीत त्यामुळे ते आंदोलनाला बसले आहेत. त्यांना जांबमुनी मोची समाज तसेच शहरातील वेगवेगळ्या पक्ष संघटना यांच्याकडून पाठिंबा मिळत आहे.
डॉक्टर पल्लोलू हे उपोषणाला बसल्याचे समजतात महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी तात्काळ त्यांना पत्र दिले आहे की, आपले संपूर्ण प्रकरण मा. आयुक्त यांचेकडेस मान्यतेस्तव पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात आलेले आहे. आजला आपल्या प्रकरणावर कार्यवाही सुरू आहे.