काँग्रेसचा सेनापती भाजपमध्ये जाणार? चर्चेला उधाण, नरोर्टेनी दिली ही प्रक्रिया
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी अनेक चर्चांना सुद्धा उधान आले आहे. चार दिवसापूर्वी दोन टर्म कॉंग्रेसच्या नगरसेविका राहिलेल्या श्रीदेवी फुलारे त्यांचे पती जॉन फुलारे हे आपल्या मुलासह भाजपमध्ये गेले. फुलारे जिथून निवडून यायच्या तो प्रभाग सध्या काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा असल्याने हा एक प्रकारे काँग्रेसला धक्का होता.
दरम्यान आता काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे हे भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेसचेच कार्यकर्ते एकमेकांना विचारत आहेत. चेतन नरोटे भाजपमध्ये जाणार का? खर आहे का? जर नरोटे गेले तर काँग्रेस सोलापुरातून संपेल असेही चर्चा करू लागले आहेत. चेतन नरोटे यांनाही तसे फोन येत असल्याचे समजले.
दरम्यान या प्रकरणी नरोटे यांना विचारले असता माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे, प्रभागामध्ये कसे निवडून यायचे हे मला माहित आहे. लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फरक असतो. त्या त्या वेळचे वातावरण पाहून मतदान होते परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या माणसाच्या कामावर होतात.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यानंतर काँग्रेसची जबाबदारी माझ्यावर आहे. साहेब, ताई कुणालाही अडचण असेल तर मला भेटायला लावतात मला अजून काय हवं आहे.




















