काँग्रेसच्या शोहेब महागामींचा पुढाकार ; 17340 महिलांना आले खात्यावर 3 हजार रुपये
सोलापूर : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यामुळे राज्यातील महिलांना दरमहा त्यांच्या बँकेच्या खात्यावर पंधराशे रुपये येणार आहेत. या योजनेमुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळते.
यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला महिलांना ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता होती अनेक कागदपत्रांच्या अडचणी आल्या, परंतु सरकारने त्या वेळेच्या वेळेत दूर केल्याचे पाहायला मिळाले.
ही योजना झोपडपट्टी भागातील प्रत्येक महिलेला मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शोहेब महागामी यांनी आपल्या कार्यालयात युद्ध पातळीवर मोफत मध्ये महिलांचे अर्ज भरून दिले. त्यांच्या कार्यालयात भरण्यात आलेल्या तब्बल 17 हजार 340 महिलांचे अर्ज मंजूर झाले असून प्रत्येक महिलेच्या खात्यावर तीन हजार रुपये मिळाले असल्याची माहिती त्यांनी दिली.