सोलापूर शहरमध्य मध्ये कॉंग्रेसला धक्का ; श्रीनिवास संगा यांनी हात सोडून कमळ घेतले हाती ; सोबत कार्यकर्तेही आले भाजपात
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पद्मशाली समाजाचे युवा नेतृत्व कुशल संघटक, श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा शहर मध्य या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी चार वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
श्रनिवास संगा यांनी नागपूर येथे भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांच्यासमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश करण्याची मागणी केली होती. यावेळी बावनकुळे यांनी मुंबई येथे पक्ष प्रवेशासाठी वेळ दिला होता.
लोकसभा निवडणुकीपूर्वी श्रनिवास संगा यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांसमवेत केलेला प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून प्रवेशानंतर सोलापूरात तेलगू भाषिकांचा मोठा मेळावा घेऊन काँग्रेससह अन्य पक्षातील तेलगू भाषिक कार्यकर्त्यांचा मोठा जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम घेणार असल्याचे श्रनिवास संगा यांनी सांगितले.
शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंखे, वडार समाजाचे युवा नेते विश्वनाथ दुर्लेकर,ऍड संदीप संगा, सोमवंशी क्षत्रिय पाटकर समाज पूर्व विभाग अध्यक्ष संतोष बसुदे, उद्योजक किशोर मार्गम, उद्योजक मधुकर सरगम, सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ उघडे, रवी गोरे आदींनी श्रीनिवास संगा यांच्या नेतृत्वाखाली भाजपात पक्ष प्रवेश केला.
यापुढील काळात पक्ष संघटनेची मजबुतीकरण व बळकटी करणासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करून पक्षाची ताकद वाढवण्याचे सूचना व शुभेच्छा देखील यावेळी बावनकुळे यांनी दिल्या.
यावेळी पक्षप्रवेश प्रसंगी भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे सचिव अक्षय अंजीखाने, प्रदेश कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष नागेश पासकंठी, प्रदेश कार्यकारणी सदस्य सागर अतनुरे,गजेंद्र कलादगी,विजय अमदाळे,रवी सोपणेकर,समीर पाटील,सुरज धोत्रे व श्रीनिवास संगा यांच्या प्रेम करणारे शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
श्रीनिवास संगा यांच्या भाजपा पक्षप्रवेशाने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ, आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आणखीन ताकद वाढणार आहे.
श्रीनिवास संगा यांनी केलेल्या पक्ष प्रवेशानंतर आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी,भाजप लोकसभा समन्वयक अमर साबळे, आमदार श्रीकांत भारतीय, भाजप जिल्हा सरचिटणीस मनिष देशमुख, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.