काँग्रेसचा कार्यक्रम इंडीत ; डिजिटल झळकले सोलापुरात ; विजयकुमार हत्तुरे यांचे मार्केट
सोलापूर : विजयपूर जिल्ह्यातील इंडीचे आमदार यशवंतराय गौडा पाटील यांच्या प्रयत्नातून कर्नाटक राज्य सरकारकडून इंडि मध्ये तब्बल 4000 कोटींची विकास कामे केली जाणार आहेत.
या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डि के शिवकुमार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष विजयकुमार हतूरे हे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सोलापूर विमानतळ या ठिकाणी उतरून ते इंडिला जाणार आहेत. त्या प्रित्यर्थ विजयकुमार हत्तूरे यांनी हद्दवाढ भागात विशेष करून जुळे सोलापूर आणि होटगी रोड या परिसरात मोठ्या प्रमाणात सिद्धरामया आणि डी के शिवकुमार यांच्या स्वागताचे बॅनर लावून जयत तयारी केल्याचे पाहायला मिळाले.