Congrats ! विना पवार यांचे प्रमोशन ; सोलापूर महापालिकेच्या झाल्या अतिरिक्त आयुक्त
राज्याच्या नगर विकास विभागाने अतिरिक्त आयु क्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे ऑर्डर काढले असून त्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त रवी पवार यांची पुणे महापालिका येथे उपायुक्त पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर सोलापुरातच असलेल्या विना पवार यांची नियुक्ती झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वीणा पवार यांना प्रमोशनने सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
सध्या या पदावर कार्यरत असलेले रवी पवार यांची पुणे महापालिकेत बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्या जागी विना पवार रुजू होणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या वीणा पवार यांनी यापूर्वी करमाळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून काम करताना महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यानंतर त्या जिल्हा नगर प्रशासन कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.आज, १५ सप्टेंबर २०२५ रोजी मंत्रालयातून निघालेल्या आदेशानुसार त्यांची सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.