अभिनंदन ! सोलापूरच्या ट्रेझरी ऑफिसर पदावर वैभव राऊत यांची नियुक्ती
सोलापूर : सोलापूर जिल्हा कोषागार अधिकारी पदी वैभव रामचंद्र राऊत यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सर्वशिक्षा अभियानात लेखाधिकारी म्हणून काम केले आहे.
मूळचे बार्शी तालुक्यातील रहिवासी असलेले डॉ. वैभव राऊत यांची सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातून पदोन्नतीवरून पुणे मनपाच्या स्थानिक निधी लेखापरीक्षा उपविभाग क्रमांक दोनच्या सहाय्यक संचालकपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर 11 जुलै रोजी शासनाचे अवर सचिव टी. आर. पवार यांनी वैभव राऊत यांच्या पदस्थापनेत अंशतः बदल करीत सुधारित पदस्थापना करीत असलेले आदेश जारी केले. यामध्ये डॉ. राऊत यांची सोलापूरचे जिल्हा कोषाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.