जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उचलणार कडक पावले ; मला गुन्हे दाखल करण्यास भाग पाडू नका
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील भविष्यातील पाणीटंचाई आणि चारा टंचाई च्या पार्श्वभूमीवर नियोजनाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा प्रशासन अधिकारी विना पवार यांची उपस्थिती होती.
सोलापूरला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण सध्या मायनस 18% मध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये हे पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरेल असे काटकसरीने नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे नदीच्या कडेचे वीज बंद करावी लागेल त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करावे तसेच जूनपर्यंत पुरेल इतका चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यामुळे चाऱ्याची इतर जिल्ह्यांमध्ये वाहतूक करता येणार नाही जर तसे आढळल्यास नाईलाजात्सव गुन्हे दाखल करावे लागतील असा इशारा दिला.