मुख्यमंत्री दौऱ्यात अमोल शिंदेंना व्हीआयपी ट्रीटमेंट ; पहा हे सर्व फोटो
सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी पंढरपूर दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी आषाढी एकादशीच्या नियोजनाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पंढरपूर मंगळवेढयाचे आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, सीईओ मनीषा आव्हाळे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूर शहर जिल्ह्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या जवळचा कोण? यावर बराच वेळा स्पर्धा पाहायला मिळते परंतु मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भोजन करण्यासाठी मंत्री, प्रशासकीय अधिकारी आमदार आणि शिवाजी सावंत वगळता केवळ अमोल शिंदे हेच दिसून आले.
यावरून अमोल बापू यांचे महत्त्व मुख्यमंत्री शिंदे दरबारी वाढल्याचे पाहायला मिळते. सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिलेल्या शिवाजी सावंत यांच्यासोबत कायमच अमोल शिंदे पाहायला मिळतात. यापूर्वी अमोल बापू सोबत दिसणारे सोलापुरातील बरेच नेते आता दुसऱ्या गटात फिरू लागल्याचे चित्र आहे, सावंत यांच्या सोबत असल्याने अमोल बापू यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात चांगली ट्रीटमेंट मिळताना दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण दौऱ्यात अमोल शिंदे हे त्यांच्या जवळ पाहायला मिळाले.