सोलापूरच्या मध्य मंडल अध्यक्षांनी सत्कारऐवजी पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला धनादेश
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी सोलापूर मुंबई विमानसेवा शुभारंभ कार्यक्रमारिता सोलापूर दौऱ्यावर आले असता,भारतीय जनता पार्टी शहर मध्य विधानसभेचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, नागेश खरात, नागेश सरगम या तिघांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली 33,333 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
याप्रसंगी सत्कार एवजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने,देवेंद्र फडणवीस यांनी शाबासकीची थाप मंडल अध्यक्षांना दिली.