चेतन नरोटे, फिरदोस पटेल की आरिफ शेख ; का साहेब येणार? शहर मध्य मध्ये एकच चर्चा
सोलापूर खासदार प्रणिती शिंदे यांच्या हक्काच्या विधानसभा मतदारसंघ असलेला शहर मध्य या मतदारसंघात काँग्रेसच्या तीन याद्या जाहीर होऊनही उमेदवाराची मात्र घोषणा झालेली नाही.
दुसरीकडे भाजप की शिवसेना यामध्ये हा मतदारसंघ भाजप आपल्याकडे सोडून घेण्यात यशस्वी झाला आहे. या ठिकाणी अनपेक्षितपणे ही उमेदवारी भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांना मिळाली आहे.
ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नावाची या मतदारसंघातून चर्चा होती परंतु त्यांनी आपण इच्छुक असल्याचे सांगून इतरांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात उमेदवारी मागितलेल्या शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेविका फिरदोस पटेल, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे यापैकी कुणाला काँग्रेस उमेदवारी देणार याकडे लक्ष आहे. का दुसराच उमेदवार या मतदार संघात येणार अशी ही चर्चा ऐकण्यास मिळते.
मुस्लिम आणि मोची समाजाने या मतदारसंघासाठी काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे माजी महापौर आरिफ शेख आणि फिरदोस पटेल हे मुस्लिम समाजातून आघाडीवर आहेत. काही वेळापूर्वीच मोची समाजाच्या 28 काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. दक्षिण प्रमाणेच आता काँग्रेस पक्ष पुढे मध्ये उमेदवारी द्यायची कुणाला असा पेच निर्माण झाला आहे.
आता तर सोलापूर शहर मध्य मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीची चर्चा होऊ लागली आहे. सुशीलकुमार शिंदे हे उमेदवार आल्यास सर्वच समाजाचा विरोध शांत होईल असेही बोलले जात आहे. आणि काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सुशीलकुमार शिंदे हे योग्य ठरतात. त्यामुळे ऐनवेळी या मतदारसंघात सर्वांना शांत करायचे असेल तर साहेब उमेदवार म्हणून येतील का असेही तर्कवितर्क काढले जात आहेत.