मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणी’साठी शिवसेनेचे मनिष काळजे ठरले ‘देवदूत’ ; काय आहे ही घटना
सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यात चर्चेच विषय असताना दुसरीकडे सोलापूरचे त्यांचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे साहेबांच्या लाडक्या बहिणीसाठी देवदूत ठरल्याची एक घटना घडली आहे. ती घटना नेमकी काय वाचा सविस्तरपणे…
दहावीत शिकणारी नंदिनी लक्ष्मण म्हेत्रे गणपतीबाप्पा आणायला गेली होती. मोलमजूरी करणाऱ्या आईने घरातल्या तीन लेकरांच्या हौसेसाठी गणपती आणायचे ठरवले होते. त्या प्रमाणे जाऊन बाप्पाची सुबकशी मूर्ती पसंतही झाली.
आपल्या धाकट्या बहिणी आणि गल्लीतल्या इतर बाळगोपाळांसह नंदिनी मोठ्या उत्साहात गाडीत बसली. दुर्दैवाने मागून येणाऱ्या सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकची आपल्या नंदिनीच्या गाडीला जोरदार धडक बसली! नंदिनीची गाडी उलटली. ती गाडीच्या बाहेर फेकली गेली. इतक्यात मागून येणारी दुसरी गाडी तिच्या पायावरून गेली आणि नंदिनीच्या आईवर आभाळच कोसळले. बापाविना पोर !! त्यात स्वत: मोलमजूरी करणारी माऊली हबकलीच! आता इतका खर्च करणार कसा आणि कुठून? रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सांगितलेला खर्च ऐकून माऊलीची छातीच दडपली.
केवळ पैशांवाचून आपली एक बहीण रुग्णालयात अडचणीत आलेल्याचे समजताच शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष अण्णा काळजे रुग्णालयात धडकले. डॉक्टरांशी बोलून खर्चाची जबाबदारी घेतली. तिथल्या तिथे त्या माऊलीच्या हातात ५० हजार रुपये ठेवले आणि धीर दिला की, पैशांकडे पाहू नका. हा भाऊ त्याच्या ‘लाडक्या बहिणी’साठी वाट्टेल ते करेल. त्या माऊलीच्या डोळ्यातल्या पाण्याला खळ नाही. आनंदाने केवळे ती मनिषअण्णाचा हात घट्ट धरून म्हणाली, “देवदूत म्हणून आलास बा!!”
“राजकारण होत राहतं पण समाजकारणाचा हा घेतलेला वसा टाकून चालत नाही.
माननीय बाळासाहेबांचे संस्कार, दिघे साहेबांचा आदर्श आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आशीर्वाद यामुळेच हे सगळे हातून घडते,” हे शब्द मनिषअण्णा बोलत असले तरी त्या पहाडी माणसाच्या देहात असलेले परोपकारी मन सहज दिसून येत! एखाद्या माऊलीकडून आशीर्वाद मिळतो, “देवदूत आहेस!”