मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापुरात ; विमान आणि चॉपरनेच फिरणार जिल्ह्यात
सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बुधवारी पुन्हा सोलापुरात येत आहे. सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू होत असून त्याच विमानाने ते पहिले प्रवासी म्हणून सोलापुरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीतच सोलापूरच्या होटगी रोडवरील विमानतळावर विमानसेवा शुभारंभ कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त कुटुंबांना त्यांच्या उपस्थितीत संसार उपयोगी किटचे वाटप हे होणार आहे.
हा कार्यक्रम संपल्यानंतर ते लगेच हेलिकॉप्टरने माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात या ठिकाणी स्वर्गीय नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहेत. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते परत हेलिकॉप्टरनेच मंगळवेढा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला ते जाणार आहेत. तिथून ते हेलिकॉप्टरनेच मुंबईला जाण्याची शक्यता आहे.