दिलीप माने सीएम देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे
सोलापूर : आषाढी एकादशीच्या महापूजा निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले. शनिवारी विमानाने सोलापूरला येऊन नंतर हेलिकॉप्टर नेते पंढरपूरला गेले त्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा हेलिकॉप्टरने सोलापूरला आले आणि मुंबईकडे विमानाने रवाना झाले.
दरम्यान रविवारी विमानतळावर आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, यांच्या समवेत सिद्धेश्वर बाजार समितीचे चेअरमन दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बाजार समिती निवडणुकीवेळी काँग्रेसचे दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्याशी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी युती केली होती. या युतीने बाजार समितीमध्ये सत्ता मिळवली. सभापती निवडी ही या चारही नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती.
दरम्यान आता सोलापुरात देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला दिलीप माने हे गेल्याने माने यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचे बोलले जात असून अजित पवारांच्या ही तितकेच जवळचे असणारे दिलीप माने हे कोणता राजकीय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय दिवसात निश्चितच सोलापुरात नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळतील हे तितकेच खरे आहे.